प्रास्ताविक

प्रिय युवा मित्रांनो,
सप्रेम नमस्कार,
तुमच्याशी संवाद साधतांना मला अगदी मनस्वी आनंद होत आहे. गेल्या 17 वर्षापासून मी खाजगी शिक्षण क्षेत्रात आहे. हजारो विद्यार्थ्यांना शिकविण्याचं भाग्य मला लाभलं. गरीब परिस्थितीतून आणि ग्रामीण भागातून आलेल्या माझ्यासारख्या तरुणाला माझ्या विद्यार्थ्यांनी आर्थिकरित्या आणि सामाजिकरीत्या उभं केलं. इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा माझ्यात अगदी शालेय जीवनापासूनच होती. पण न आर्थिक आधार होता न सामाजिक पाठबळ होत. माझ्या शिकवणीचा मोबदला म्हणून जे काही विद्यार्थ्यानी मल आर्थिक सहकार्य केल त्यातूनच मग समर्पण आरोग्य आणि शिक्षण या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. कुठल्याही प्रकारची शासनाची मदत न घेता या संस्थेने विविध समाजपयोगी काम केली. सेवाभाव वृत्तीने काम करत असतांना हे जाणवलं की केवळ सेवा करून समजाच्या समस्या कायम स्वरूपी सुटत नाहीत तर सेवेसोबतच समाजात आम्रुलाग्र बदलही झाला पाहिजे. समाज हा व्यक्ति यक्तिमधील परस्परसंबंध असतो.म्हणून समाजात बादल घडवून आणण्यासाठी व्व्यकटीमध्ये अर्थातच स्वत:मध्ये मूलभूत परिवर्तन झाल पाहिजे. मी शाळेत असतांना वाटायच की, मी जग बद्ल्ण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महाविद्यालयात आल्यावर वाटल जग खूप मोठ आहे. त्यापेक्षा आपण आपला देशच बादलायला पाहिजे. कोंलेज सोडतानना विचार केला की देश बदलण अवघड आहे; आपण मपहाराष्ट्र बदलला तर चालेल पण मात्र मी स्वत:लाच बादलायच ठरवलय. कारण आपण बद्ल्ल्याशिवाय समाज बदलू शकत नाही.

गेल्या वीस वर्षाच्या चिंतनतुं, निरीक्षणातून स्वनुभवातून स्वत:ल आणि इतरांना बदलण्याचा माल एकच मार्ग श्रेष्ठ वाटला. तो म्हणजे मानवतेचा मार्ग. आपल्यात माणुसकी असेल तर आपण आप्तस्वकीयांशीच काय इतर माणसाशी आणि प्राणिमित्रांशी मैत्रीभावाने वागतो. माणुसकी लोप पावलेल्या समाजाचा र्हास अटळ असतो. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश देणार्‍या आपल्या संस्कृतीला मानवता हाच गाभा आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बूद्ध, भगवान महावीर यांनी मानवतेचा सर्वच्च स्थान दिले.आता विश्वात्मके देवे मानणार्‍या संत ज्ञानेश्वरपासून जे का रंजले गांजले संत तुकारामपर्यंत संतांची परंपरा आपल्यात लाभलेली आहे. आयुष्यभर हातात झाडू घेऊन स्वछेता करता करता कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील वाईट विचारांचा कचरा साफ करण्याचं काम संत गाडगे बाबांनी केल. काकवे कैलास आणि दसोह अर्थात श्रम्प्रतिष्ठा व सामाजिक सहकार्यावर महात्मा बसवेश्वरणी भर दिला. महात्मा फुले नुसार ‘निर्मिकचा धर्म सती आहे भांडणे अनेक कशासाठी.’ रायतेला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे वागवणारे छत्रपती शिवराय हे मानवतेचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. डों. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,माझे तत्वज्ञान हे मानवतेवर आधारित आहे आणि ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन गुंफलेले आहे. अगदी खेड्यापासुन वैश्विक स्तरापर्यंत मानवतेसाठी करी करत राहण्याचा उपदेश स्वामी विवेकानंद आपल्याला देतात.

थोडक्यात आपल्या सर्व महापुरुषांनी आणि संतांनी मानवतेची शिकवण अंगिकारलेली होती.अर्थातच ती शिकवण महापुरुषांनी नाकारणे म्हणजेच या सर्व महापुरूषांना, संतांना आणि आपल्या संस्कृतीला नाकारणे होय. मानवतेला प्राधान्य न दिल्यामुळे आज आपल्याला आज विविध सामाजिक समस्यांना सामोरं जाव लागत आहे. जातीयतेच्या भिंती माणसाला माणसापासून दूर करत आहेत. धर्माची स्थापना मानवाच्या कल्याणकरिता झाली. परंतु धर्माचा चुकीचा अर्थ काढून कट्टरतेची बीज पेरण्याचा काम जगभर चालू आहे. धर्म अगोदर स्वत:मधील दोष काढण्यास सांगतो. परंतु स्वत:मधील दोष लपवून दुसर्‍यांचा द्वेष करण्याची शिकवण आज मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. धार्मिकतेचे जीवन जगण्यापेक्षा धार्मिकतेचे प्रदर्शन करण्याकडे आपला कल जेवढे घटक आहे त्याहीपेक्षा मानसातील माणुसकिला बळी जाने अधिक घटक आहे असे माला वाटते.

युवा मित्रांनो देशाच व समाजाचं भवितव्य आपल्या हाती आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून खूप काही कारव लागणार आहे. सामाजिक जाणीव असणार्‍या अशा युवकांना घेवूनच युथ इंटीग्रेशन मिशन अनेक अनेक सामाजिक समस्या सोडविणाच प्रयत्न करत आहे. ज्यात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाचा समस्या आहेत. त्याचसोबत युवकांसाठी व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन आणि त्यांच्या सप्त क्लागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक युवक मानवी कल्याणचा या कार्याला वाहून घेण्यास तयार आहेत. पण माला जाणीव आहे की, आपल्यापैकी सर्वांनाच इच्छा असूनही असे करता येत नाही आणि तसे करावे अशी अपेक्षाही नाही. पण आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातुण जेंव्हा वेळ भेटतो तेंव्हा आपण हया मिशनच्या माणुसकीच्या विचारधारेशी सहमत असाल तरीही आपले स्वागत कारण शेवटी मानसतील माणुसकी जागे करणे हा या मिशनचा उद्देश आहे.

शेवटी नम्रपणे नमूद करावस वाटत की, या मिशनचा समर्पण सेवाभावी संस्थेव्यतिरिक्त इतर कुठल्याही संस्थेशी,संघटनेशी,राजकीय चळवळीशी संबंध नाही. माणुसकीच्या या कार्याला मी माझे तन, मन आणि धन अर्पण करत आहे. या कार्यात आपला सहभाग, सहकारी,सूचना अभिप्रेत आहेत.

आपला स्नेहांकीत

गणेश हनुमंतराव चोंगुले